Monday, May 20, 2024

अजित पवारांची सभा सुरू असताना शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी; दादा भरसभेत संतापले

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील घोडेगाव येथे सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती उठला आणि त्याने शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. यावर अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी व्यासपीठावरून अजित पवार म्हणाले की, ”तुम्हाला कोणीतरी सांगितल्याचं दिसतंय, जाऊन तिथे.. असं बोला, आम्ही काम करायला आलोय गप्पा मारायला नाही.” अजित पवार असं म्हणाल्या नंतर शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी करणारा व्यक्ती तिथून निघून गेला.दरम्यान, यासाबेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”अमोल कोल्हे आव्हान देत असतील तर त्यांचे काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे. आव्हान देणाऱ्यांना महत्त्व देत नाही. जो मला आव्हान देतोय, त्याला मीच खासदारकीचे तिकीट देऊन निवडूनही आणलं. मात्र होत ठिक आहे, दिवस बदलत असतात. त्यांना करायचे ते करू द्या.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles