Tuesday, April 23, 2024

अजित पवारांना भर कार्यक्रमात दाखवला सुप्रिया सुळेंचा ‘तो’ भावुक व्हिडीओ, अजित पवार म्हणाले…

मराठी कलाविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी दिग्दर्शक-गायक अवधूत गुप्ते यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ स्टाईलने उपमुख्यमंत्र्यांची खास मुलाखत घेतली. भर कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी अजित पवारांना ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सुप्रिया सुळे भावुक झालेल्याचा जुना व्हिडीओ दाखवला.अवधूत गुप्तेंनी ‘झी चित्र गौरव’च्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांना दाखवला. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. पण, प्रत्येकाची राजकीय भूमिका आणि घरगुती नातेसंबंध वेगळे असतात. तुम्ही पहिल्यापासून आमच्या घरामध्ये पाहिलंत, तर आमचं संपूर्ण घराणं हे शेतकरी कामगार पक्षाचं होतं. त्यावेळी आमचे स्वर्गीय वसंतदादा पवार त्या पक्षाचे लीडर होते आणि त्यांना तिकीट सुद्धा मिळालं होतं. संपूर्ण घर शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना पवार साहेब फक्त काँग्रेसचं काम करत होते. कारण, त्यांना ती विचारधारा पटलेली होती. त्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे.”
https://www.instagram.com/zeemarathiofficial/?utm_source=ig_embed&ig_rid=b1f67aa6-e284-4274-b7f3-024e0ac2582e

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles