Tuesday, April 30, 2024

प्रत्येक वेळी मीच केलं, मीच केलं असं कसं म्हणता… राजेंद्र पवार अजित पवारांवर बरसले…

बारामती: बारामतीत आम्ही अजित पवार यांच्यापेक्षा जास्त राहतो. आम्ही सामाजिक काम करतो, ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्विकारलेले होतं. दादांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे हे ठरलेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले, असं ते म्हणू शकत नाहीत, अशा शब्दांत बारामती अँग्रोचे अध्यक्ष, राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे.

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून आम्ही प्रचार करतो. गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये उभे होते, त्यामुळे आम्ही तिकडे जोर लावला होता. त्याअगोदरच्या निवडणुकीतही आम्ही गाव ते गाव, घर ते घर असा प्रचार केलेला आहे. एक दोन निवडणुकीत आम्ही नसलो, तर गेल्या 35 वर्षातील निवडणुकीतच आम्ही नाही, असे ते म्हणणार असतील तर मग काय बोलायच. त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला मोरगावमध्ये तासभर लोकांशी का बोलाव लागत याचे उत्तर त्यांनीच द्यावे,” असं टोलाही राजेंद्र पवारांनी अजित पवारांना लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles