Thursday, May 2, 2024

शेतकऱ्यांची चिंता वाढली, राज्यात आठवडाभर अवकाळी पावसाचे सावट…

पुणे : राज्यात पुढील आठवडाभर अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज, शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी थंड वारे शुक्रवारी उत्तर भारताच्या सीमावर्ती भागात सक्रिय होतील. बंगलाच्या उपसागरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतातून तेलंगणापर्यंत वाऱ्याची खंडित स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. परिणामी किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागांत आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles