Tuesday, May 28, 2024

भुलभुलैय्या सोडा आणि लंकेंच्या प्रचाराला आता तरी सुरवात करा… सचिन पोटरे यांचे रोहित पवारांना सणसणीत उत्तर…

आमदार रोहित पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला. त्यावर भाजपचे पदाधिकारी सचिन पोटरे यांनी रोहित पवार यांना सणसणीत उत्तर दिले आहे. सचिन पोटरे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , श्री.अमित शहा, डोनाल्ड ट्रम्प ,ओबामा ,पुतीन या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांना सल्ला देता देता तुम्हाला नगर दक्षिण साठी वेळ मिळाला याची खरं तर #ब्रेकिंग_न्यूज व्हायला पाहिजे होती.
महाराष्ट्राचा नेता होण्याची महत्वकांक्षा होती तर ही लढत Dr Sujay Vikhe Patil & Rohit Rajendra Pawar यांच्यातच व्हायला पाहिजे होती अशी मतदारसंघातल्या जनतेला इच्छा होती पण विखेंना टक्कर द्यायला दम पाहिजे तो तुमच्यात नव्हता म्हणून Nilesh Lanke ला बळीचा बकरा केला.

#बालिश
#नौटंकी
#भुलभुलैय्या सोडा आणि लंके च्या प्रचाराला आता तरी सुरवात करा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles