Monday, May 13, 2024

विजूभाऊ औटींनी भाळवणीतील कोविड सेंटरचे सगळच काढलं..कोवीड सेंटरचे कोणतेही दप्तर उपलब्ध नाही…देश विदेशातून मिळालेल्या देणग्यांचा हिशेब नाही…

नगर:
जिल्हा आरोग्य विभाग आणि सिव्हील हॉस्पिटल यांच्याकडे नीलेश लंके प्रतिष्ठान संचालीत भाळवणी येथील शरदचंद्र पवारसाहेब कोवीड सेंटरचे कोणतेही दप्तर उपलब्ध नाही. त्यामुळे येथे किती रुग्ण दाखल झाले होते, किती रुग्णांवर उपचार देण्यात आले याची कोणतीही अधिकृत सरकारी आकडेवारी उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी केला आहे. कोवीडच्या दुसर्‍या लाटेत दगावणार्‍या रुग्णांची संख्या जास्त होती. अत्यवस्थ झालेले रुग्ण भाळवणीतून नगरला हलविण्यात येत असताना रुग्ण दगावत असल्याचा बोभाटा टाळण्यासाठी भाळवणी येथील या कोवीड सेंटरचे रुग्ण पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविल्याचे आणि तेथे ते मयत झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे पारनेरमधील ग्रामीण रुग्णालयातील दुसर्‍या लाटेतील मृत रुग्णांचा आकडा १११ वर गेल्याची नोंद झाली. अर्थात हा आकडा यापेक्षा जास्त आहे. मात्र, सरकारी नोंद झालेली ही आकडेवारी आहे. भाळवणी कोवीड सेंटरमध्ये अस्वस्थ वाटू लागलेले सर्वच रुग्ण नगरला हलविण्यात आले असताना त्यांची नोंद पारनेरला हलविण्यात आले अशी करण्यात आली. पारनेरला हलवले असे दाखविण्यात आलेल्या या रुग्णांपैकी तब्बल १११ रुग्ण दगावले! अर्थात ही नोंद सरकारी कागदावर असली तरी आकडा यापेक्षा मोठा असल्याचा गंभीर आरोप विजय औटी यांनी केला आहे.

कोवीड सेंटर वस्तुस्वरुपात मोठ्या प्रमाणात देणग्या- मदत मिळत असताना दुसरीकडे रोख स्वरुपात आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या जाहीर करण्यात आलेल्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांच्या देणग्या जमा होत होत्या. याच्या बातम्या देखील रोज काही दैनिकांंमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्या देखील आमच्याकडे पुरावे म्हणून आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यातून जसा येथे आर्थिक मदतीचा हात पुढे आला होता, तसाच तो देशातून आणि परदेशातूनही पुढे आला होता. कॅनडा, रशिया, अमेरीका येथील काही दानशुरांनी या कोवीड सेंटरला जशी मदत केली तशीच मदत नगरमधील अनेक बँकां- खासगी कंपन्यांनी देखील या कोवीड सेंटरला लाखो रुपयांची देणगी दिली. ही संपूर्ण रक्कम नीलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात जमा झाली. या कोवीड सेंटरला सरकारी खर्चाने डॉक्टर, नर्स देण्यात आल्या. येथे चहा- नाश्त्यासह जेवणासाठी अनेकांनी हात पुढे केला. मग, असे असताना प्रतिष्ठानच्या खात्यावर जमा झालेल्या कोट्यवधींच्या निधीचा हिशोब जनतेला अद्याप का देण्यात आला नाही असा सवाल औटी यांनी उपस्थित केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles