Monday, May 20, 2024

भारताचे दोन माजी दिग्गज क्रिकेटपटू मैदानात एकमेकांना भिडले..व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील पहिला एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक झाला. सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सकडून खेळणारा गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज श्रीसंत यांच्यात वाद झाला. दोघांतील शाब्दिक वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंत पुढे गेला आणि गंभीरकडे पाहू लागला. मग गंभीरनेही श्रीसंतला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, प्रकरण फार पुढे न घेऊन जाता दोघेही शांत झाले.
Video

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles