Friday, January 17, 2025

अरे काय चाललंय तुमचं.. एकतर माझं कुंकू लावा नाहीतर त्यांचं तरी लावा… अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावले

अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत अजितदादांचा पारा चढलेला दिला. त्यांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला. त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

सभेत अजित पवारांनी त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. मी काही वर्षांपूर्वी धरणाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्याचा मोठा फटका मला बसला. आता जर तुम्ही माझ्याबाबतीत काही चूक केली तर पुन्हा घराची पायरी चढू नका. काहीजण मी आलो की माझ्याबरोबर असतात. दादाला दिसावं म्हणून अगदी पुढं असतात. दादाची पाठ फिरली की दुसरे आले की लगेच त्यांच्याबरोबर. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं तरी कुंकू लावा. एकतर माझं लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय लावलाय चाटाळपणा. या गोष्टी झाकून राहत नाहीत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles