विरोधी पक्षांकडे कोणताही अजेंडा नाही. ते पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेत आहेत. भविष्यात जर कॉंग्रेस सत्तेत आली तर ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाचार्थ अमित शाह यांची जालन्यात सभा झाली. त्यावेळी बोलतांना शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला समृद्ध आणि संपन्न केलं. नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे काम नरेंद्र मोदींनीचं केलं. तर शरद पवार अँड कंपनीने राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.