महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवार अर्ज भव्य शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. त्यातच आता शाहू महाराज यांची संपत्ती समोर आली असून, ते जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.
शाहू महाराज यांच्या नावे 297 कोटी 38 लाख 8 हजार रुपयांची संपत्ती आहे. मागील महिन्यात शाहू महाराज यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही विवरण पत्रात देण्यात आली आहे.
शाहू महाराज यांच्या नावावर 122 कोटी 88 लाख 59 हजार रुपये किमतीची शेतजमीन आहे. राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील घर आणि न्यू पॅलेसची इमारत शाहू महाराज यांच्या नावावर आहेत. शाहू महाराज यांच्याकडे असणाऱ्या वाहनांची किंमत जवळपास 6 कोटी इतकी आहे. जगात केवळ दोन जुन्या पद्धतीची मेबॅक कार आहे. त्यातील एक शाहू महाराज यांच्याकडे आहे, तर मर्सिडीज बेंझच्या तीन कार, एक इनोव्हा आणि एक महिंद्रा थार शाहू महाराज यांच्याकडे आहेत.