Tuesday, April 30, 2024

या मतदारसंघात भाजप ॲड. उज्वल निकम यांना मैदानात उतरवणार?

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात भाजपला निर्णय घेता आलेला नाही. भाजप नेते आशिष शेलार, त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांनी नकार दिल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं हा प्रश्न कायम. सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यातूनच आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव समोर आलं आहे.

मतदारसंघासाठी निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. पूनम महाजन यांना विरोध आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यांच्याजागी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. याआधी आशिष शेलार यांना विचारणा झाली होती. परंतु, त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles