Wednesday, May 1, 2024

मैदानात स्वतःचे उमेदवार नाहीत पण मनसेने 38 लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले…नगरची जबाबदारी यांच्यावर…

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, अशा सूचना आहेत. याबाबत महायुती आणि मनसे यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले समन्वयक त्यासाठी प्रत्यक्ष मतदारसंघाचा दौरा करतील, कार्यकर्त्यांच्या बैठक घेतील. ते महायुतीला निवडणूक प्रचारात मदत करणार आहेत. याबाबतच्या सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यातील ३८ मतदार संघासाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

नाशिक आणि नंदुरबार : माजी महापौर अशोक मुर्तडक, अभिजीत पानसे आणि जयप्रकाश बाविस्कर. ठाणे : अभिजीत पानसे, पालघर : अविनाश जाधव, भिवंडी आणि कल्याण : आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, पुणे : अमित ठाकरे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे आणि बाळा शेडगे.
जळगाव आणि रावेर : अभिजीत पानसे, शिरूर : राजेंद्र बाबू वागस्कर, अजय शिंदे. मावळ : नितीन सरदेसाई, रणजीत शिरोळे, अमेय खोपकर रायगड : नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग : शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव. शिर्डी आणि नगर : बाळा नांदगावकर, संजय चित्रे. संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली : बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ : संदीप देशपांडे, राजू उंबरकर. बारामती, सोलापूर, माढा : दिलीप धोत्रे, सुधीर पाटसकर. सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले : बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles