Thursday, May 22, 2025

मनोज जरांगे कुणाच्याही खिजगणतीत नाहीत, ते काय नरेंद्र मोदींपेक्षा मोठे नेते आहेत काय?

मराठा समाजाच्या एकीमुळेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. प्रत्येक टप्प्यात मोदींना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावं लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे काय मोदींपेक्षा मोठे नेते लागून गेले का?, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले. ते रविवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भुजबळ यांनी म्हटले की, जरांगे म्हणजे काय मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? अख्खा हिंदुस्थान जरांगेंना घाबरलाय. जरांगे काय सांगतात, काय बडबड करतात. त्याची अक्कलहुशारी किती? नाशिक आणि बीडमध्ये जाऊन मनोज जरांगे म्हणतात की, या ओपनच्या जागांवर ओबीसी उमेदवार कशासाठी उभे राहतात? त्यांना कळत नाही ओबीसींना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण नाही. ही गोष्ट ज्याला कळत नाही, त्याला आपण काय सांगायचं. मनोज जरांगे सध्या कोणाच्याही खिजगणतीतही नाही, ते उगाच बेडकाप्रमाणे फुगत आहेत, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles