रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत अशी लढाई होणार आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी सांगलीत जाऊन ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्यासमोर तेच हवे होते. भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
आम्हाला तोच उमेदवार समोर हवा होता, संजय राऊतांनी मानले भाजपचे आभार…
- Advertisement -