Thursday, May 16, 2024

भाजपच्या महिला आमदाराकडून पंतप्रधान मोदींना पैठणीचा शेला भेट

MLA Shweta Mahale..
भाजप आमदार श्वेता महाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या पैठणीचा शेला त्यांना भेट दिला.

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे पाणी पेनटाकळी पर्यंत आणण्याची तसेच चिखली येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी केली. विदर्भातील प्रस्तावित असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये पैनगंगा नदीवर असलेल्या मध्ये पेनटाकळी धरणामध्ये आणून नेहमीच दुष्काळग्रस्त असलेले दक्षिण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या कडे दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान पत्र देऊन केली. सोबतच बुलडाणा जिल्हा व पश्चिम विदर्भात सोयाबीन पीक मोठया प्रमाणात घेतल्या जात असल्याने चिखली येथे शासकिय सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणण्याची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पहिल्यांदा निवडून आलेल्या विधान सभा सदस्यांकरिता संसदेच्या “पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस” (PRIDE) (Erstwhile BPST) या संस्थेमार्फत नवी दिल्ली येथे दिनांक ५ व ६ एप्रिल २०२२ रोजी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अभ्यास वर्गात सहभागी झालेली आहे.
अभ्यास वर्गात सहभागी सदस्यांनी पंतप्रधान मा नरेंद मोदी साहेब यांची भेट घेतली.
यावेळी माझ्या सोबत महीला आमदारांचे शिष्ट मंडळ उपस्थित होते, अशी माहिती श्वेता महाले यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles