अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार असून ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. चार जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा तिसर्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील. तसेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील हेच खासदार होतील असा विश्वास खा. विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जेथे जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात. तेथील विजय निश्चित होतो असेही ते म्हणाले. या मैदानावर तिसर्यांना सभा होत आहे. तिसर्यांना मोदींना पंतप्रधान करायचे आहे. आणि माझा अनुक्रमांकही तीन आहे. विरोधकांकडे विकासाचे कोणतेची व्हिजन नाही. त्यामुळे तिसर्यांना नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. तसेच अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे हेच खासदार होतील असा विश्वास खा. विखे यांनी व्यक्त केला.