Friday, May 17, 2024

राहुरी मतदारसंघात पाझर तलाव दुरूस्ती, २ कोटी ३९ लाखांचा निधी, नगर तालुक्यातील ‘या’ गावांना लाभ

नगर : मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी 39 लाख 65 हजार रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील पोहीचा पाझर तलावासाठी पंधरा लाख 79 हजार, खडांबे बुद्रुक येथील तनपुरे मळा दहा लाख 75 हजार, गंगापूर येथील गावतलावासाठी सहा लाख 80 हजार, कोपरे गावतलावसाठी तीन लाख सहा हजार, वांबोरी गावठाण येथील साठा बंधारा दोन लाख 12 हजार, गुंजाळे येथील साठा बंधारा सात लाख 39 हजार, आरडगाव येथील खडकीनाला साठा बंधारा नाला 10 लाख 65 हजार, ताहराबाद येथील गावठाण सहा लाख 48 हजार, पांगरमल खंडोबा वस्ती 44 लाख 99 हजार, खोसपुरी नंबर 2 गावठाण पाझर तलाव दुरुस्ती 49 लाख 46 हजार, बहिरेवाडी वाकीवस्ती साठा बंधारा 10 लाख दोन हजार, इमामपूर गावठाण साठा बंधारा दुरुस्ती नऊ लाख 9 हजार, पिंपळगाव माळवी भोपते पाझर तलाव दुरुस्ती 49 लाख 23 हजार, पिंपळगाव माळवी लहारे वस्ती को. प. बंधारा तेरा लाख 82 हजार असे एकूण दोन कोटी 39 लाख 65 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. पाझर तलाव दुरुस्ती झाल्यानंतर पाण्याच्या साठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ परिसरातील शेतकर्‍यांना होणार असल्याचे नमूद केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles