Saturday, May 18, 2024

निलेश लंके यांना मताधिक्य पारनेर की नगर शशिकांत गाडे यांनी स्पष्टच बोलले….

महाविकास आघाडीचे उमेदवार आ.नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेदरम्यान सुपे (पारनेर) यथे आयोजित बैठकीत उमेदवार तुमचा, पारनेर तालुका आणि नगर तालुक्याच्या मताधिक्याची स्पर्धा लावायची आहे. बाळसाहेब हराळ, संदेश कार्ले यांच्यासह सहा जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. आम्ही पुढे गेलो तर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नगरला द्यावी लागेल असे प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगताच नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत गाडे यांच्या मागणीस प्रतिसाद दिला. तर पैज आम्हीच जिंकणार असा विश्‍वास पारनेरच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे,बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले,शिक्षक नेते रा.या.औटी, बाबासाहेब तरटे,खंडू भुकन, किसनराव रासकर, नगरसेविका प्रियंका औटी, राधाकृष्ण वाळुंज, माजी सभापती रामदास भोर, माऊली कळमकर, रामदास गोल्हार, दीपक पवार, बापूसाहेब भापकर, पुनम मुंगसे, माजी सभापती नंदाताई शेंडगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles