Saturday, May 18, 2024

अनिलभैयांसारखा नगरकरांसाठी मोबाईल खासदार होईल, निलेश लंकेंचे नगर शहरात मोठे शक्तिप्रदर्शन

अनिलभैय्या मोबाईल आमदार होते, मी नगरकरांचा मोबाईल खासदार होईल
स्वाभिमान जनसंवाद यात्रेत निलेश लंके यांनी घातली नगरकरांना साद
नगर (प्रतिनिधी) – शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिलभैय्या राठोड हे नगरकरांचे मोबाईल आमदार होते, मी त्यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला जर नगरकरांनी या लोकसभा निवडणुकीत संधी दिली तर मी ही त्यांच्या सारखा नगरकरांचा मोबाईल खासदार होईल आणि रात्री अपरात्री कधीही तुमच्या सुख दुखात सहभागी होईल अशी आपुलकीची साद नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नगरकरांना घातली आहे.
निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा बुधवार (दि.१७) पासून नगर शहरात सुरु आहे. दोन्ही दिवस या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. या यात्रे दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणी नगरकरांशी लंके यांनी आपुलकीने संवाद साधला.
गुरुवारी (दि.१८) तपोवन रोड येथील मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली याप्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, आपचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, अशोकराव बाबर, संजय शेंडगे, संजय झिंजे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, योगीराज गाडे, सुरेश तिवारी, गिरीष जाधव, सचिन शिंदे , शाम नळकांडे, संतोष गेनपा, अंबादास शिंदे, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डीले, रघुनाथ झिने, प्रताप गडाख, सुशांत कोकाटे, आदिंसह नगर तालुक्यातील पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारफेरीस ज्या प्रमाणे काल नगर शहरातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे आजही उपनगर भागात मोठ्या संख्येने या प्रचार फेरीस प्रतिसाद मिळत आहे, जास्तीत जास्त मताधिक्य त्यांना उपनगरातून मिळवून देऊ असा विश्वास संभाजी कदम यांनी व्यक्त केला . यावेळी अभिषेक कळमकर म्हणाले, की महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांनी नगरच्या विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड केली अन हि निवड आम्ही सर्व एकत्र मिळून त्यांना खासदार करून सार्थ ठरवू असे त्यांनी सांगितले. यावेळी किरण काळे म्हणाले, येणार्‍या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठिमागे उभी असून, त्यांच्या प्रचार फेरीस मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे.
या प्रचार रॅलीचा शुभारंभ तपोवन रोड येथील तपोवन मंदिर येथून सुरु होऊन ही रॅली प्रभाग क्र.१ ते ०७ मधील तपोवन मंदिर,ढवन वस्ती ,पवन नगर ,वैदूवादी, श्रमिकनगर ,बालाजी मंदिर ,वाणी नगर ,यशोदा नगर ,एकविरा चोक ,सिटीप्राईड, शिरसाठ मळा ,भगवान बाबा चोक ,पारिजात चोक ,कलानगर चोक ,प्रोफेसर चोक ,झोपडी कँटीन ,मिस्कीन मळा ,महावीर नगर ,बोरुडे मळा ,भूतकरवाडी ,सावेडी गाव ,बोल्हेगाव आदी ठिकाणी काढण्यात आली. या प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी लंके यांचे औक्षण केले तर युवकांनी त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles