Sunday, April 28, 2024

आमदार निलेश लंके आज मोठा निर्णय घेणार? तातडीने बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यासाठी ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके आज दुपारी आपल्या मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.

सुपा येथे दुपारी १ वाजता हा मेळावा होणार असून या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार निलेश लंके हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आमदार निलेश लंके सध्या अजित पवार गटात आहेत. मात्र, त्यांना शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवायची असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व विषयांवर ते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles