Tuesday, April 30, 2024

जे स्वत:च्या नेत्याचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे कसे होणार…विखेंचा लंकेंना टोला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘संकल्पपत्रा’तील मुद्द्यांची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या वेळी भाजपचे पदाधिकारी अॅड. अभय आगरकर, शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले, धनंजय जाधव, निखिल वारे, आनंदा शेळके आदी उपस्थित होते.

विखेंविरुद्ध प्रचार करण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार आले नाहीत, असे होणारच नाही. जिल्ह्यात त्यांनी आमच्याविरुद्ध सभा घेतली नाही तर ते दहावे आश्चर्य ठरेल, असा उपरोधिक टोला मंत्री विखे यांनी लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्याबद्दल बोलताना विखे म्हणाले, की त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. कोणाला कोणाचे नेतृत्व मानायचे याचे स्वातंत्र्य आहे आणि जनता उघड्या डोळ्याने कोलांटउड्या पाहत आहे. जे स्वत:च्या नेत्याचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे कसे होणार, हा खरा प्रश्न आहे, असे भाष्यही विखे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles