शरद पवारांसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या. त्यांनी अजित पवारांचं काटेवाडीतलं घर गाठलं. त्यावेळी घरात अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार मतदारसंघात होत्या. सुळे आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण मतदान सुरु असताना त्यांची झालेली भेट मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण करणारी आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझं मतं आहे की याला फक्त मी इमोशनल भावनिक स्ट्रटजी असतात. पण मी टिप्पणी करणार नाही. शत्रू तर नाही, भाऊ बहीण असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की, अजित पवार यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे. आई पाठीशी असणं खुप महत्वाचं असतं. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काय असतं. यावेळी त्या काकींचा आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी आल्या असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे थेट दादांच्या भेटीला गेल्याने मात्र चर्चांना उधाण आलं आहे.