Saturday, May 25, 2024

अहमदनगरसह १२ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पावसाच्या सरी; वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’

अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. मुंबई पुणे अशा शहरांमध्ये नागरिक उन्हामुळे त्रस्त झालेत. अशात आज शनिवारी पुण्यासह अन्य १२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. हवामान खात्याने पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, धुळे, जळगाव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली येथे पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर मराठवाड्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, नांदेड येथे वादळी वारे, विजांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles