Saturday, May 18, 2024

स्टेजवर खुर्ची नसल्याने निलेश लंके खाली बसले, शरद पवार राणी लंकेंना म्हणाले….

महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. सभेवेळी व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. तेव्हा निलेश लंके यांनी आपण लोकसभेचे उमेदवार आहोत, आपल्यासाठी ही प्रचारसभा घेतली जात आहे, याची कोणतीही तमा न बाळगता थेट जमिनीवर बसकण मारली. सभेत इतर वक्त्यांची भाषणं सुरु असताना निलेश लंके स्टेजच्या एका कोपऱ्यात खाली मांडी घालून बसले होते. सभेतील या दृश्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा राहिली. या सभेत शरद पवार हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनीही विरोधकांचा समाचार घेण्यासोबत निलेश लंके यांच्या साधेपणाविषयी भाष्य केले.

निलेश लंके आणि राणी लंके यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. मी त्यांच्यासाठी फुलं आणली पण निलेश लंके यांनी ती फुलं दुसऱ्यालाच देऊन टाकली. निलेश लंके यांचा स्वभाव असाच आहे. ते स्वत:साठी काही ठेवायचे नाही, दुसऱ्याला देऊ टाकायचे, या वृत्तीचे आहेत. मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला, जो अखंडपणे जनतेत राहतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles